उरुळीकांचन’ मधील कुटूंबाला घरात घुसून मारहाण ,वडीलोपार्जित जमिनीचा हिस्सा विकला ..!!
उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली) येथील एका कुटूंबाला नातेवाईकांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या
प्रकरणी १० जणांवर लोणीकाळभोर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी सविता तुषार जगताप (वय -३७, रा. सोनार आळी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोपट बाबुराव बंड (वय – ५१), वैभव पोपट बंड (वय – २७), विद्या पोपट बंड (वय – ५०, रा. सर्व कॅनोलचे शेजारी, शिंदवणे रोड, उरुळी कांचन ता. हवेली), मच्छिंद्र बाबुराव बंड (वय – ४४), गोरख बाबुराव बंड (वय – ४८), ओमकार काका बंड (वय – २१), अनिता काका बंड (वय – ४९), पुनम विठ्ठल बंड (वय – २९), अनिता बाळु बंड (वय ५०), अनिता गोरख बंड (वय ४३, रा. सर्व सिंगापुर ता. पुरंदर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी असताना अचानकपणे वरील १० जण एकदम घरामध्ये घुसले. यावेळी सविता जगताप यांना सिंगापुर (ता. पुरंदर जि पुणे) येथील वडोलोपार्जित शेतजमीन मधील आजीचा हिस्सा का विकला म्हणून बेदम मारहाण करु लागले. या मारहाणीत पती, मुलगा यांना मारहाण करुन तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.