वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने एका तरुणाचा मृत्यू

पुणे : वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन निघालेल्या एका तरुणाची दुचाकी स्लिीप होऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घोरपडीगावातील अनंत टॉकीज येथून समोर आली आहे.

बबलू हरिप्रसाद वर्मा (वय ३८, रा. घोरपडीगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार मेघांत सचिन लक्ष्मण मेमाणे यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बबलू हे महंमदवाडी येथे त्यांच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना घोरपडीगावातील अनंत टॉकीजसमोरून त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यांच्या हाताला, तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाल्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बबलू यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडल्याने गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
