सावकाराच्या जाचाला कंटाळून गरीब व्यावसायिकाची आत्महत्या, पुण्यातील दोघांना पुणे पोलिसांनी केली अटक..!!


पुणे : सततच्या जाचाला कंटाळून एका भंगार व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडी येथील तुळजाई पठार येथून समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आजिनाथ सर्जेराव लोखंडे (रा.सर्वे नं. ८, तुळजाई मंदिराजवळ, तुळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.याप्रकरणी आजिनाथ यांच्या पत्नी सारिका लोकांडे यांनी गुरुवारी (ता.२२) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सहकारनगर पोलिसांनी ३ खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.

रामदास काशिनाथ त्रिंबके (रा. बाभुळगाव, ता. माढा, जि. सोलापूर) व्यास गुलाब यादव (रा. जांभुवाडी) मयूर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींचे नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आजिनाथ लोखंडे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांना आर्थिक अडचण भासल्याने त्यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र व्यवसायातील मंदीमुळे त्यांना आरोपीचे पैसे परत करता आले नसल्यामुळे आरोपींना पैसे परत कर असे म्हणत पैशांसाठी फिर्यादी यांच्या पतीकडे तगादा लावला होता.

पैसे परत करत नसल्याच्या कारणावरून आरोपींना आजिनाथ यांना सतत शिवीगाळ करून धमकी देण्याचा प्रकार सुरु होता. तसेच पैश्यांची सतत मागणी करून त्यांना मानसिक त्रास देखील देत होता. वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या पतीने राहत्या घरात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याच तक्रारीत म्हंटल आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!