मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी ; सुरक्षा यंत्रणा सतर्क…!


मुंबई : मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरुच आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरुभाई अंबानी शाळा उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकून महिनाही उलटला नाही, तोपर्यंत काल मुंबई येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देण्याची धमकी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीने फोन करून विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू

अशी धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव इरफान अहमद शेख असे सांगून आपण इंडियन मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याचे सांगितले आहे.

त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती मुंबई पोलीस व सुरक्षा यंत्रणांना दिली. यामुळे यंत्रणा देखील सतर्क झाल्या असून विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी सहारा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!