परीक्षेला आला अन् भलतंच घडलं!! पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर भयंकर प्रकार, शाळा प्रशासनात उडाली खळबळ…

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शिक्षिकेनं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शाळेत परीक्षेसाठी विद्यार्थी आल्यानंतर महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजून तपास सुरू आहे.
या घटनेने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विद्यार्थी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो. तर आरोपी शिक्षिका याच शाळेत शिकवायला आहे. विद्यार्थी शाळेत दहावीची पूर्व परीक्षा द्यायला आला होता.

नंतर शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळेच्या आवारात त्याच्यावर अत्याचार केले. मुलाच्या आईने शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तसेच तपास सुरू केला.
याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.