पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला महिन्याला देईल ‘एवढ्या’ रुपये व्याज, होईल मोठा फायदा, जाणून घ्या..

पुणे : तुम्ही देखील सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजने (कडे वळण फायदेशीर ठरू शकते. या योजनेचा उद्देश दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात नियमित उत्पन्न देणे हाच आहे.
त्यामुळे निवृत्त व्यक्ती, गृहिणी किंवा निश्चित उत्पन्नाची गरज असलेल्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्यावर दर महिन्याला निश्चित व्याज मिळत राहते.
दरम्यान, योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. ५ वर्षे पूर्ण झाल्यावर मूळ गुंतवणूक रक्कम परत मिळते. सध्या या योजनेवर वार्षिक ७.४% दराने व्याज दिले जाते. ही योजना सरकारी असल्याने गुंतवणूक सुरक्षित राहते.
विशेष म्हणजे, जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली, तर ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. मात्र पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडले तर १५ लाख रुपये गुंतवता येतात. या संपूर्ण गुंतवणुकीवर तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते.
उदाहरणार्थ, जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून १५ लाख रुपये या योजनेत गुंतवले, तर ७.४% वार्षिक व्याजानुसार तुम्हाला दर वर्षी १,११,००० रुपये मिळतील. म्हणजेच, प्रत्येक महिन्याला ९,२५० रुपये उत्पन्न मिळेल. ५ वर्षांच्या कालावधीत एकूण व्याज ५,५५,००० रुपये मिळेल. ही रक्कम फक्त व्याजावरून मिळालेली असून मूळ १५ लाख रुपये वेगळेच राहतात.
दरम्यान, ही योजना आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता मिळवण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, गृहिणी किंवा निवृत्त व्यक्तींना या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. दर महिन्याला मिळणारे स्थिर उत्पन्न अनेक खर्चांसाठी उपयोगी ठरते. शिवाय, गुंतवणुकीवर कोणतेही मार्केट रिस्क नसल्यामुळे या योजनेचा भरवसा अधिक आहे.