अजित पवारांची ही शेवटची निवडणूक , कोणी मांडली भविष्यवाणी ..!!

माढा : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा देखीलकेली गेलेली आहे. सध्या चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते मात्र जानकर यांनी अखेर शरद पवार यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटलांसोबत असलेल्या 30 वर्षांचं वैर संपवून जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. दरम्यान, उत्तम जानकर यांनी इंदापूर या ठिकाणी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
जानकर म्हणाले, “अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्ष हा अस्तित्वात राहणार नाही. त्याचबरोबर अजित पवार देखील राजकारणात नसतील अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे. दरम्यान या टिकेनंतर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.