आता फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होईल ही कार, चालेल नॉनस्टॉप 470km, कोणत्या कंपनीने केला हा चमत्कार? जाणून घ्या..

सध्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता चीनच्या ई-कार उत्पादक कंपनी BYD ने तंत्रज्ञानाची जादू दाखवली आहे. कंपनीचा दावा आहे की, पेट्रोल किंवा डिझेल कारमध्ये इंधन भरण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्याच वेळेत त्यांच्या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होईल.
तुम्ही ही कार नॉनस्टॉप 470 किलोमीटर चालवू शकणार आहे. ई-कार खरेदीदारांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे चार्जिंग, ज्याला जास्त वेळ लागतो. पण, चिनी कंपनी BYD चे अध्यक्ष आणि संस्थापक वांग चानफू यांचा दावा आहे की, त्यांच्या नवीन हान एल सेडानची बॅटरी फक्त 5 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यामुळे ही कार फायदेशीर आहे.
ही कार एका चार्जिंगमध्ये सुमारे 470 किलोमीटर प्रवास करू शकते. कंपनी पुढील महिन्यापासून या कारची विक्री देखील सुरू करेल. चिनी कंपनी BYDने अमेरिकन कंपनी टेस्लाला जोरदार टक्कर दिली आहे. कंपनीने ई-कारच्या निर्मितीसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म देखील सादर केला आहे. ज्यावर भविष्यात अनेक कार तयार केल्या जातील. यामुळे या कारला लोकांची किती पसंती मिळणार हे लवकरच समजेल.
BYD ने टेस्लाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी विक्री करणारी ई-कार कंपनी बनली आहे आणि लवकरच ती भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना आखत आहे. त्यांच्या वाहनाला चार्ज करण्यासाठी पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनाला पेट्रोल पंपावरून जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ लागेल.
यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे अशा लोकांना ई-कार खरेदी करण्यास प्रोत्साहित केले जाईल जे सध्या त्या खरेदी करत नाहीत जेणेकरून लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान तासन्तास चार्जिंगचा त्रास टाळण्यासाठी त्या खरेदी करता येतील. यामुळे भविष्यात अनेक बदल आपल्याला दिसून येणार आहेत.