‘या’ बँकेचा खातेदारांना दणका ; सेव्हिगं बँक खात्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय…


पुणे : देशातल्या बँकिंग क्षेत्रातलं जाळं फारच विस्तारलेलं आहे. पैशांचे मोठे व्यवहार तर बँकेच्या मदतीनेच करावे लागतात. दुसरीकडे खासगी आणि सरकारी बँकादेखील आपला आर्थिक फायदा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करताना दिसतात. दरम्यान, आता आयसीआय या बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे खातेदारांना मोठा दणका बसणार आहे.आयसीआयसीआय बँकेने सेव्हिंग बँक खात्यांसाठी मिनिमम अॅव्हरेज अमाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ थेट पाच पटीने करण्यात आली आहे. त्यामुळे खातेदारांच्या खिशाला आता खात्री लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आयसीआयसीआय या बँकेने ग्राहकांच्या सेव्हिंग बँक खात्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बदललेल्या नियमाअंर्गत आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना आता आपल्या बँक खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. हा नियम 1 ऑगस्टपासूनच लागू झाल्याचे ग्रहित धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता ICICI बँकेच्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. तसे केले नाही तर खातेदारांना दंड भारावा लागू शकतो. या निर्णयामुळे आता अनेकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्या नियमानुसार आता ICICI बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागतील. तसेच निमशहरी भागातील खातेदारांना ही मर्यादा 25 हजारांची आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही मर्यादा 10 हजारांची असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!