प्रेमासाठी पाहिजे ते ! तेरा जणांना प्रियसीने विष घालून हत्या केल्याचे उघड …..
Pakistan : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रियकरासोबत लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात तरुणीने जेवणात विष मिसळून तिच्या कुटुंबियांतील 13 जणांची हत्या केल्याचे उघड झालं आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडली आहे. या प्रकरणी सिंध पोलिसांनी सदर तरुणीला अटक केली .
खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी कुटुंबातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर सर्व 13 सदस्य आजारी पडले. त्यात कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला तर दुस-या दिवशी चार जणांचाही रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी जेव्हा यासंदर्भात अधिक सखोल तपास केला, तेव्हा पोळी बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या गव्हात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष पाजल्याचे तपासात उघड झालं आहे.
यासंदर्भात तरुणीच्या प्रियकराचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यानंतर रविवारी या दोघांना पोलिसांनी अटक केली.