तुला गाडीवरून शाळेत सोडतो म्हणत नेलं लॉजवर, न्हावरेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, घटनेने उडाली खळबळ….


शिरूर : शिरूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुलीला ‘तुला माझ्या गाडीवरून शाळेत सोडतो”, असे सांगून आरोपीने न्हावरे येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला शिरूरच्या पुढे नेऊन एका लॉजवर मुलीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. यामुळे संताप व्यक्त केला जात असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत शिरूर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली आहे. या घटनेची फिर्याद अल्पवयीन पिडीतेने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. कुणाल अशोक गारगोटे (वय-१९ न्हावरे) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात वातावरण तापलं आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही सकाळच्या वेळेस तिच्या घरुन रस्त्याने शाळेत चालली असताना, आरोपी पाठीमागून दुचाकीवर मुलीच्या जवळ आला आणि बळजबरीने मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले व तुला शाळेत नेऊन सोडतो असे सांगून, शिरूरच्या पुढे एका लॉजवर नेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले, शिरूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली होती.

शिरूर पोलिसांनी पोक्सो कायाद्या अंतर्गत कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. याबाबत आता पुढील तपास सुरू असून सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढतच चालल्या आहेत.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके करत आहेत. याबाबत पोलिसांनी अनेकांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!