राज्यात 5 ते 15 जुलै दरम्यान धो- धो पाऊस पडणार! ‘या’ जिल्ह्याना पंजाबराव देशमुख यांचा इशारा, जाणून घ्या…

पुणे : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलासादायक अंदाज दिला आहे. पंजाबराव डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, १ आणि २ जुलै रोजी अहिल्यानगर, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा आणि जळगाव या ११ जिल्ह्यांमध्ये १ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत अतिवृष्टीची स्थिती निर्माण होऊ शकते. जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. ३० जून रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पंढरपूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली आहे.
तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात सध्या सुरू असलेला पाऊस अजून काही दिवस सुरू राहील. तो लवकर थांबण्याची शक्यता नाही. नाशिक जिल्ह्यात सध्या अति मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव, पारोळा आदी ठिकाणीही ३ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, यामध्ये १० ते १५ जुलै दरम्यानही मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डख म्हणाले, जुलै महिन्यात पावसाचा खंड फारसा जाणवणार नाही. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यंदाचा मान्सून वेळेआधीच धडकल्यामुळे अनेक भागांत आधीच पावसाने जोर धरलेला आहे. केरळमध्ये २४ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातही सगळीकडे पोहोचला होता.