घरी कोणी नव्हते, सोसायटीबाहेर भाजीवाल्याकडे गर्दी होती, कोंढव्यातील तरुणीच्याच घरी आरोपी कसा शिरला? महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्यामुळे हादरलं आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री एक अज्ञात इसम ‘कुरिअर बॉय’ बनून घरात शिरला आणि २५ वर्षीय तरुणीवर केमिकल स्प्रे मारून अत्याचार केला. या घटनेने पूर्ण पुणे हादरले आहे.

नराधमाने तरुणीच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून ‘मी पुन्हा येईल, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेन’ असा मेसेज टाइप केला होता. यावेळी आरोपीने त्या तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला.

त्यामुळे तरुणी बेशुध्द झाली. सुमारे तासाभराने तरुणीला शुद्ध आली. त्यानंतर मोबाइलमधील फोटो आणि मेसेज पाहून लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची दहा पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार पीडित तरुणी तिच्या भावासोबत गेल्या वर्षभरापासून कोंढवा परिसरात राहायला आहेत. ही तरुणी कल्याणीनगर येथील एका कंपनीत नोकरी करते. तर, तिचा लहान भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तरुणीचा भाऊ गावी गेल्यामुळे तरुणी सध्या घरी एकटीच होती. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी करून आरोपी सोसायटीमध्ये शिरला.

तो तरुणीच्या फ्लॅटबाहेर गेला. तरुणीने घराचा दरावाजा उघडला. मात्र, सेफ्टी दरवाजा बंदच होता. त्यावेळी त्याने ‘तुमचे बँकेचे कुरिअर आले आहे,’ अशी बतावणी केली. तरीही तिने ‘माझे पार्सल नाही,’ असे म्हणत त्याला नकार दिला. तेव्हा त्याने ‘तुमची स्वाक्षरी घ्यावी लागेल’ असे म्हणत तरुणीला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडलं.

त्याच्या कागदावरती सही करण्यासाठी पेन घ्यायला म्हणून तरुणी आतील रूममध्ये गेली. त्यावेळी त्याने फ्लॅटचा दरावाजा बंद करून घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर केमीकल स्फ्रे मारला त्यावेळी तरूणी बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केले. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. ही घटना घडलेली इमारत बहुमजली असून, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक; तसेच सीसीटीव्ही देखील आहेत.

पोलिसांनी सोसायटीत प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या अशा दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. इमारतीत असंख्य फ्लॅट आहेत. मात्र, आरोपी नेमका पीडितेच्याच फ्लॅटमध्ये कसा गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याने रेकी केली होती का, आरोपी तिला ओळखतो का, त्याने पाळत ठेवली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!