पाकिस्तानमध्ये उडाली झुंबड!! सिंधू नदीत सापडला सोन्याचा खजिना, पाकिस्तान होणार मालामाल..


कराची : सध्या पाकिस्तानच्या हाती मोठा खजिना लागला आहे. येथील सिंधू नदीमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. नदीत सोनं सापडत असल्याचं समजल्यापासून येथील सोनं गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यामुळे पाकिस्तानचे आता नशीब पालटणार का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये मोठी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अनेक देशांकडून त्यांनी कर्ज घेतले आहे. अशातच हे सोनं सापडल्याने परिस्थिती बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानमधील सिंधू नदीमध्ये सुमारे ८०० अब्ज पाकिस्तानी रुपये एवढ्या किमतीचे सोने सापडले आहे.

या सोन्याचं वजन सुमारे ६५३ टन एवढं आहे. हे सोनं मिळवण्यासाठी लोक नदी पात्राकडे धाव घेत आहेत. सोनं मिळवण्यासाठी लोक दिवसभर नदीच्या पात्रात भांडीकुंडी घेऊन सोनं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर स्लुइस मॅटचा वापर करून सोनं बाहेर काढलं आहे. यावर सरकार नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. परंतू आता येथे मोठ्या संख्येने लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादली भरुन येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत. नंतर ते त्यामध्ये सोनं शोधत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सोनं अनेकांचे नशीब बदलून टाकणार आहे.

यामुळे मात्र पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीच्या तळाला होणाऱ्या प्रमाणाबाहेरील खोदकामामुळे पाण्यामधील जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच सोनं काढण्यासाठी पा-याचा वापर होत असल्याने नदीची इकोसिस्टिम बिघडू शकते, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!