पुण्यात वाढलेत चप्पल चोर! तिघांविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


पुणे : चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. चपलेचं दुकान फोडून चोरी झाली आहे.

सागर दत्ता चांदणे, आकाश विक्रम कपूर आणि अरबाज जाफर शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावी आहेत. हरेश अहुजा यांनी याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

मिळालेल्या माहिती नुसार, खडकी भागात असलेल्या मुस्लिम बँकेच्या समोर फिर्यादी हरेश अहुजा यांचं चपलेचं दुकानं आहे. अहुजा हे रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आरोपींनी रात्रीच्या सुमारास हे दुकानं फोडलं. त्यांनी दुकानातून तीस बुटांचे तर पंधरा चपलेचे जोड चोरले. चोरीचा माल घेऊन जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

दरम्यान, आपल्या दुकानात चोरी झाल्याचं अहुजा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!