बायको माहेरी गेली अन् पुढं सगळं रक्तरंजित घडलं!! एक खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडले ५ मृतदेह….


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. चार निष्पाप मुलांचा जीव घेत बापाने स्वतःही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

राजीव कुमार (वय.३६) असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याची पहिली मुलगी (वय.१२) वर्षांची होती.

मेहनत आणि मोलमजुरी करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातानंतर तो खूप बदलला होता. छोट्या गोष्टींवरही राजीव भयंकर चिडायचा, रागाच्या भरात तो कुणालाही काहीही बोलायचा.

त्याच्या मनात खोलवर काहीतरी साठलेले होते, पण त्याने ते कधीच कोणाला सांगितले नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून त्याचे आणि त्याच्या पत्नीचा वाद वाढत होता. वाद एवढा टोकाला गेला की, दोन दिवसांपूर्वी ती माहेरी निघून गेली.

राजीव मुलांसोबत घरी होता. त्याच्या चार मुलांनी आईची आठवण काढली असेल का? कदाचित हो, पण त्यांना काय माहित होतं, की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या रात्रीची ती सुरुवात होती. त्या रात्री नेमकं काय घडलं, हे कोणीच सांगू शकत नाही.

पण पोलीस तपासातून हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. रागाच्या भरात आणि मानसिक तणावाखाली असलेल्या राजीवने धारदार चाकू घेतला आणि एकामागोमाग एक, आपल्या चार मुलांचा गळा चिरला. चारही मुलांना संपवून त्यानंतर स्वतःही गळफास लावून घेतला.

दरम्यान, राजीवने असं का केलं? आपल्या लेकरांना मारून स्वतःही मरण पत्करण्याइतका मोठा त्रास त्याच्या मनात नक्की काय होता? या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावातले लोक दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!