पाण्यामुळे पाय घसरला अन् आईच्या हातातून बाळ २१ व्या मजल्यावरुन….; विरारमध्ये ७ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत


विरार : विरार येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. विरारमध्ये २१ व्या मजल्यावरून पडून ७महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विरार येथे बोळींज परिसरातील जॉय विले नावाच्या निवासी संकुलात वास्तव्यास आहे. या निवासी संकुलातील एकविसाव्या मजल्यावर हे दाम्पत्य राहत असून सदाने दाम्पत्य सात महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले होते.

या दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षांनी बाळ झालं होतं, त्यामुळे हे बाळ त्यांच्यासाठी खूप खास होतं. त्यांना मुलगा झाला असून त्याचं नाव व्रिशांक ठेवण्यात आले होते.पती विकी सदाने नेहमीप्रमाणे कामावर गेले होते व बाळाला बघण्यासाठी घरात त्यांचे काही नातेवाईक आले होते. पूजा सदाने यांनी त्यांच्या बाळाला कडेवर घेतले होते. याचदरम्यान बाळाला खांद्यावर घेऊन त्या खोलीतील खिडकी बंद करण्यासाठी गेल्या.

खिडकीजवळ लादीवर पाणी असल्याने त्यांचा पाय घसरला. पाण्यावर पाय घसरून तोल गेल्यामुळे पूजा सदाने यांच्या कडेवर असलेले त्यांचे सात महिन्यांचे बाळ २१ व्या मजल्यावरील त्यांच्या खोलीच्या खिडकीतून खाली पडले. व्रिशांकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इमारतीच्या एकवीसाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे सदाने दांपत्याला ७ वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला ७ महिने पूर्ण झाले होते. बाळ गेल्यामुळे सदाने दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती यामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास बोळींज पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!