लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये..


पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतुन महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना उशिरा का होईना पण ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे.ऑगस्टचे 1500 रुपये सप्टेंबर मध्ये खात्यात जमा झाले आहेत. आता सप्टेंबर हप्त्याकडे लक्ष लागले असताना नवरात्र उत्सवात हप्ता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असल्याने या उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यातील महिलांना नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे.

दरम्यान या महिन्यात पैसे मिळाले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर मध्ये मिळाले आहे. यामुळे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारून चालत नाही. त्यामुळे आता सप्टेंबरच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!