लोखंडी नांगर अंगावर पडून ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंड तालुक्यातील घटनेने हळहळ..

दौंड : अंगणात खेळताना लोखंडी नांगर अंगावर पडल्याने पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खुटबाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. २१) सायंकाळी घडली आहे.

वेदा विकास थोरात (राहणार खुटबाव तालुका दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
वेदा गावातच बालवाडीचे शिक्षण घेत होती.या घटनेमुळे खुटबाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर व्यावसायिकांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन दुखवटा व्यक्त कला. रात्री उशिरा ओकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Views:
[jp_post_view]