पुण्यात सैराटचा थरार, आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने कुटुंबीयांचा संताप! तरुणाला जबर मारहाण, लेकीचे दिवसाढवळ्या अपहरण, घटनेने खळबळ..

पुणे : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावांनी आपल्या दाजीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी याठिकाणी ही घटना समोर आली आहे.

आरोपींनी गावातील १५ ते २० जणांना सोबत घेत तरुणाच्या घरावर हल्ला केला. त्यांनी घरात घुसून दाजीला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी विवाहित बहिणीला जबरदस्तीने उचलून नेलं आहे. हा संपूर्ण प्रकार एका स्थानिकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.
घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात सैराटचा थरार, आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने कुटुंबीयांचा संताप! तरुणाला जबर मारहाण, लेकीचे दिवसाढवळ्या अपहरण, घटनेने खळबळ..आरोपी टोळकं एका तरुणीचं अपहरण करून तिला घेऊन जाताना दिसत आहेत. विश्वनाथ बबन गोसावी असं मारहाण झालेल्या ३९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विवाहितेच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरजातीय प्रेमविवाहाच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय जखमी तरुण विश्वनाथ गोसावी याचं प्राजक्ता नावाच्या एका २८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी इथं वैदिक पद्धतीने विवाह केला होता. पण हे लग्न मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हतं.
याच कारणातून ३ ऑगस्ट रोजी विश्वनाथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये मुलीच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांचा समावेश आहे. पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण करतानाचा सर्व प्रकार एका स्थानिकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. ज्यात आरोपी विवाहितेला बळजबरीने घेऊन जाताना दिसत आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.