मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामागील भयंकर कारण समोर, 2 पक्ष्यांमुळे झाला अपघात? 100 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू?


अहमदाबाद : याठिकाणी एअर इंडियाचे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन टेकऑफ केलं होतं. त्यानंतर 15 मिनिटात हे विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. यामध्ये अनेकांचे जीव गेल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार टेकऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले. त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले. पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता. पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यामुळे विमान जाऊन आदळले, असे सांगितले जात आहे.

लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल. हा देशातील सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो अत्यंत भयावह आहे.

विमान कोसळताच मोठा स्फोट झाला असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. AI171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविककडे रवाना होतं. तसेच यामध्ये एकूण २४२ प्रवासी होते. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान जमिनीवर कोसळलं.

मेघाणी नगर या रहिवासी भागात ही दुर्घटना झाली. विमान कोसळल्यानंतर लगेचच त्याने पेट घेतला. घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विमान झपाट्याने खाली येताना दिसते आणि काही सेकंदात भीषण स्फोट होतो. परिसरात लोकांची धावपळ सुरू होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने दाखल झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!