अल्पवयीन दिव्यांग मुलाबरोबर दोघा नराधमांचे धक्कादायक कृत्य, घटनेने एकच संताप…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये सर्वांना हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका १४ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आले आहेत. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
स्वप्नील गावरगुरु (वय २९) आणि आशिष शिंदे (वय ३५) असे या नराधमांची नावे आहेत. त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी केली जात आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी एका १४ वर्षीय दिव्यांग असलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा नराधमांकडून दारूच्या नशेत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. ही बाब पिडीत अपंग मुलाने आपल्या आईला सांगितली.
त्यानंतर त्यांचे कुटुंब हे ऐकून हादरून गेले. त्यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली. पोलिसानीही तातडीने कारवाई करत गुन्ह्याची नोंद केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यांना शहर आणि परिसरात शोधण्यात आलं. पिडीत मुलांने त्यांचे वर्णन सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले आहे.