मुलीच्या लग्नादिवशी नको तेच घडलं! धाकट्या मुलीची बॅग आणायला जात असताना दुचाकी गाडीला पाठीमागून टेम्पोची जोरदार धडक; वडिलांचा मृत्यू
आंबेगाव : मोठ्या मुलीच्या लग्नादिवशी धाकटी मुलगी ऋतुजाची कपड्याची बॅग आणण्यासाठी ऋतुजा व तिचे वडील आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील घरी जात असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर ऋतुजा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संदीप दत्तात्रय पोपळघट (वय-५२ वर्षे ) अशे अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपळघट यांची मोठी मुलगी अक्षदा हिचा विवाह सोहळा शनिवार ३० मार्च रोजी दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला. हा विवाह झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर लग्न झालेल्या मुलीची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतुजाला पाठवायचे होते. म्हणून ऋतुजा वडील संदीप पोपळघट यांच्यासोबत लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी लोणीच्या दिशेने जात होती.
त्यानंतर बांधनवस्ती या ठिकाणी आले असता गतिरोधक आला म्हणून दूचाकीचा वेग पोपळघट यांनी कमी केला. त्याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने जोरात दोघांना जोरात धडक दिली. या धडकेत संदिप पोपळघट हे डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. पोपळघट यांना प्रथम लोणी व नंतर चाकण या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगी ऋतूजाचा एक पाय फॅक्चर झाला असून दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
दरम्यान, या अपघातात संदीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुलगी ऋतूजाचा एक पाय फॅक्चर झाला असून दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.