जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण सोडत ग्रामीण विभागाच्या राजपत्राने ;चक्राकार पध्दतीने अनेक इच्छुकांच्या तयारीवर फिरणार पाणी…

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षण निश्चित करण्यासाठी आता नवीन नियमावली लागू झाली आहे. ग्रामीण विकास विभागाने याबाबतचे राजपत्र जारी केले असून यापुढे 2002 पासून चालत आलेली चक्राकार पद्धत आता संपुष्टात आली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांचं आरक्षण नव्याने काढण्यात येणार आहे.
आरक्षणाच्या या बदलत्या पद्धतीमुळे ज्या उमेदवारांनी मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून तयारी सुरू केली आहे, त्यांची निराशा होऊ शकते. यापुढे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मध्ये ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने जागा आरक्षित केल्या तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आणि महिलांचे आरक्षण हे सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण 73 जिल्हा परिषद गट आणि 13 पंचायत समितीमध्ये 146 गण निश्चित केले आहेत. त्यानुसार एकूण 20 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असतील.ज्यापैकी दहा जागा ओबीसी महिलांसाठी राखीव असतील उर्वरित 41 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील ज्या पैकी 20 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केले जातील. अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांसाठी अधिक जागा आरक्षित झाल्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी एक जागा वाढली आहे. दरम्यान पंचायती समिती निवडणूकासाठी देखील हे सूत्र लागू असणार आहे.