सत्तासंघर्षाचा लवकरच निकाल!! विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाची नोटीस, ठाकरे गटाला मोठा दिलासा…


मुंबई : सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता

ठाकरे गटाकडून या प्रकरणात एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाकडून विधासभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन आठवड्याच्या आत उत्तर द्या , असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच तो निश्चित कालावधीमध्ये घेणं अपेक्षीत असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

मात्र आता सुनावणीस विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान , या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाकडून आता विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!