कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात खरा मास्टरमाइंड कोन? पोलिस तपास काय निष्पन्न झालंय..!!


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी तीन राऊंड गोळीबार केला. त्यात शरद मोहोळ यांचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिस तपासात आता अनेक घटनांचा उलगडा सुरू झाला आहे. मुन्ना हा मुख्य आरोपी असला तरी खरा मास्टरमाईंड कोण याबाबत माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोण आहे तो मास्टरमाईंड?

शरद मोहोळ याच्या हत्येमधील आरोपी नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले यांचं पुर्ववैमनस्य होतं. याआधी देखील त्यांच्यामध्ये भांडणं झाल्याची तक्रार होती. फुल प्लॅनिंग करून शरद मोहळ याचा खून करण्यात आला आहे. तसेच मुस्न्ना पोळेकर त्याचा मामा नामदेव उर्फ पप्पू कानगुडेचाच माणूस होता. मुन्ना पोळेकर याने मोहोळ याच्याशी ओळख निर्माण करून विश्वासात घेतले. मागच्या पंधरा दिवसांपासून मोहोळच्या ऑफिससह तो त्याच्यासोबत फिरत होता.

इन्स्टाग्रामवर केल्या होत्या पोस्ट

मुन्ना पोळकर याचे इन्स्टा अकाऊंट पाहिले तर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये मामा आधारस्तंभ असल्याच्या अनेक पोस्ट केलेल्या आहेत. मामासोबत त्याचे अनेक फोटो असलेले पाहायला मिळतील. आरोपींमधील विठ्ठल गडले आणि नामदेव कानगुडे यांची आधीची भांडणं होतीच, त्यामुळे काटा काढण्यासाठी त्यांनी भाच्याला म्हणजचे मुन्ना पोळेकर याला मोहरा बनवलं असल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!