कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी अजूनही खरी माहिती लपवली जात आहे, रोहित पवार यांनी उपस्थित केला प्रश्न, म्हणाले…


दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बहुचर्चित कला केंद्रावर गोळी बार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. तसेच आता दौंड तालुक्यातील वाखरी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलै ला मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आता कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, दौंड तालुक्यातील चौफुला जवळ असलेल्या वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव तर आहेच मात्र पोलीस या प्रकरणात खरी माहिती लपवत आहे.

या गोळीबारात एक महिला कलाकार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती आम्ही समोर जनते समोर आणूच, मात्र ही माहिती जर खरी निघाली तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, मागील चार दिवसांपासून दौंड तालुक्यातील चौफुला जवळ असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरण राज्यात गाजत आहे. 21 जुलैच्या रात्री न्यू अंबिका कला केंद्रात लावणी लावायची की डीजे वरची गाणी लावायची या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीभरात एका महिला कलाकार जखमी झाल्याचीही चर्चा आहे. ही घटना घडल्यानंतर ही घटना संबंधित कला केंद्राच्या मालकाकडून आणि व्यवस्थापाकडुन लपवण्यात आली.

माध्यमांनी हे प्रकरण समोर आणल्याने आणि त्यात या प्रकरणात सत्ताधारी आमदाराचा भाऊ असल्याने सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी करत हे प्रकरण उचलून धरले. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले.

मग मात्र अगोदर आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असा प्रकार घडलाच नाही असे छातीठोकपणे दावा करणाऱ्या पोलिसांनीच अखेर ही घटना घडली असल्याची कबुली पत्रकार परिषद घेऊन दिली. या प्रकरणात चार व्यक्तींविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!