देशात थंडीत पडणार पाऊस ! वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्याने थंडीसह पाऊसाचा विलक्षण योग.. !!
नवी दिल्ली :पाकिस्तान मध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्याने देशात थंडीत पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२१ नोंव्हेबर नंतर ढगात पावसाची शक्यता निर्माण होऊन २४ ते २५ तारखेनंतर पाऊस कोसळू शकतो असा अंदाज हवामान खात्याने नोंदविला आहे.
हवामान खात्याच्या शक्यतेनुसार, तापमान २ अंशांनी घसरणार आहे. त्यानंतर दिल्लीत थंडी आपले रंग दाखवू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पाकिस्तानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे, जो हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. पूर्वेकडे सरकल्याने वायव्य भारतातील मैदानी भागात वारे वाहतील आणि त्यामुळे एक-दोन दिवसांत कमाल तापमानात घट होऊ शकते.
एक हलका वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील पर्वतांमध्ये प्रवेश करू शकतो, ज्यामुळे उंच भागात हलका पाऊस दिसू शकतो. यामुळे वायव्य भारतातील मैदानी भागात थंडी वाढेल. स्कायमेटच्या मते, पुढील दोन दिवसांनंतर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये तापमानात घट होईल, त्यामुळे थंडी वाढू शकते.
स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज किनारी आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.