आंदोलन पेटणार ; “कुठल्याही परिस्थितीत मैदान सोडणार नाही” ; पोलिसांच्या नोटीसीवर जरांगेची ठाम भूमिका….


मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणासाठी आझाद मैदानात बसले आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि मनोज जरांगे यांच्यात तणाव वाढला असून त्यांना आझाद मैदान रिकाम करण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र नोटीस स्वीकारण्यास नकार देत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मैदान सोडणार नाही असं स्पष्ट सांगितल आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, आंदोलकांना दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि इतर भागांतून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कोअर कमिटी सदस्यांना नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस न स्वीकारता कुठल्याही परिस्थितीत तीन वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली.. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!