पुलावरून नदीपात्रात उडी मारुन जीव देण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचे लोणी काळभोर पोलीसांनी कर्तव्य तत्परता दाखवुन वाचविले प्राण.

लोणी काळभोर : मुळा-मुठा नदीचे पुलावरून आर्थिक अडीअडचणीमुळे नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचे लोणी काळभोर पोलीसांनी कर्तव्य तत्परता दाखवुन तिचे प्राण वाचविले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारांस लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत थेऊर पोलीस चौकीत एक इसम धावत धावत आला व त्याने घाबरलेल्या अवस्थेत थेऊर-कोलवडी नदीचे पुलावरून एक महिला जीव देण्याचे मनस्थित उभी आहे. अशी माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच प्रसंगावधान दाखवुन पोलीस चौकीचे महिला पोलीस अंमलदार,पोलीस हवालदार वैशाली नागवडे व मार्शल कर्तव्यावरील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई ताम्हाणे, घुले हे थेऊर कोलवडी नदी पुलावर पोहचले असता त्यांना एक महीला नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेली दिसली. त्या महीलेस समजावून सांगुन तिचे मत परीवर्तन केले. त्यावेळी ती बाजूला झाली. तिला तात्काळ ताब्यात घेऊन थेऊर पोलीस चौकी येथे आणले.

पोलीस चौकीत आल्यानंतर तिची चौकशी केली असता तिचे नावं वैष्णवी सुरेश पांडागळे, (वय-२६, रा. भाडळे वस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. व तिचे पती सुरेश पांडागळे यांना बोलाऊन घेतले. त्या दोघांकडे आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता, त्या महीलेने आर्थिक अडीअडचणीमुळे आत्महत्या करण्याकरीता गेले असल्याचे सांगितले.
त्या महिलेचे आत्महत्या करण्याचे कारण समजाऊन घेऊन त्या महिलेस व तिच्या पतीस पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व महिला पोलीस हवा वैशाली नागवडे यांनी समुपदेशन करुन त्यांना जीव देण्यापासुन परावृत्त केले. व त्या महिलेस तिच्या पतीच्या ताब्यात देऊन सुखरुप घरी पाठविले आहे. एका महिला पोलीस अंमलदाराने कर्तव्य तत्परता दाखवुन एक महिलेचा जीव जाण्यापासून वाचविलेला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
सदरची कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, मदतनीस पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार वैशाली नागवडे, पोलीस शिपाई ताम्हाणे, घुले, महीला पोलीस शिपाई कदम खोत, पोळ यांनी केली आहे.