चंद्रयान ३ चे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले ती जागा आता ‘या’ नावाने ओळखली जाणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा..


नवी दिल्ली : चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, ती जागा आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये बोलताना केली.

शिव’ मध्ये मानव कल्याण सामावलेले आहे. ‘शक्ती’मध्ये संकल्प पूर्ण करण्याच सामर्थ्य आहे. त्यामुळे विक्रम लँडर जिथे उतरला त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ नाव दिल्याचं मोदींनी जाहीर केले आहे. तसेच २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर ध्वज फडकावला. आतापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणाही पीएम मोदी यांनी केली.

ग्रीस दौऱ्यावरुन परतल्यानंतर पीएम मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले. यावेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी पीएम मोदी यांना चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेविषयी माहिती दिली. त्यानंतर पीएम मोदी यांनी इस्त्रोच्या शास्ज्ञज्ञांना संबोधित केले. यावेळी ते भावूक झाले होते.

आपण तिथे पोहोचलो, जिथे कोणी पोहोचले नव्हते. आपण ते केले जे याआधी कोणी केले नव्हते . हा आजचा भारत आहे. निर्भीड, झुंझार भारत आहे. हा तो भारत जो नवीन विचार करतो, नव्या पद्धतीने विचार करतो. डार्क झोनमध्ये जाऊन प्रकाशाचा किरण पसरवतो. २१ व्या शतकात हाच भारत जगातील मोठ्या समस्यांच समाधान करेल. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

२३ ऑगस्टचा दिवस प्रत्येक भारतीयाला विजय आपलाच वाटत होता. प्रत्येक भारतीयाला असे वाटले की जणू तो स्वत: मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

आजही आपले सर्वांचे अभिनंदन केले जात आहेत, संदेश दिले जात आहेत आणि हे सर्व माझ्या देशाच्या वैज्ञानिकांमुळे शक्य झाले आहे. तुमची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. आज संपूर्ण जगाने भारताची वैज्ञानिक भावना, आपले तंत्रज्ञान आणि आपला वैज्ञानिक स्वभाव स्वीकारला आहे.

मी तुम्हा सगळ्यांच कौतुक करीन तेवढं कमी आहे. मी तो फोटो बघितला ज्यात मून लँडरने चंद्रावर मजबुतीने पाय रोवले आहेत. एकप्रकारे विक्रमचा विश्वास आहे, दुसऱ्याबाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. प्रज्ञान चंद्रावर पदचिन्ह उमटवतोय, वेगवेगळ्या कॅमेऱ्यामधून रिलीज झालेले फोटो बघितले हे अद्भभूत आहे. असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!