पुणेकरांनो तुम्ही आहारात खाणारे पनीर भेसळयुक्त.? कर्नाटकातून आणलेला पाच हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त…

पुणे : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे पाच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कात्रज परिसरात ही संयुक्त कारवाई केली..
पुणे शहरात बनावट पनीरची विक्री होत होती. बनावट पनीर शहरातील अनेक दुकाने आणि हॉटेलमध्ये विकले जात होते. यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल ४ हजार ९७० किलो बनावट पनीरचा साठा जप्त केला आहे.
एकूण दहा लाख रुपये किंमतीचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. ऐन सणसुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पनीरचा बनावट साठा जप्त झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अशा प्रकारे ओळखा पनीर बनावट आहे..
बनावट पनीर कडक असते तर भेसळ नसलेले पनीर नरम असते. यामुळे पनीर घेताना तो असली आहे की नकली चेक करुन घ्या.
पनीर दूधापासून तयार केला जातो. यामुळे पनीरची चव दूधासारखी असते. पनीरमध्ये भेसळ असेल तर त्याची चव बदलते. त्यामुळे ते भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होते.
पनीर तपासण्यासाठी आयोडीन टिंचर हा एक पर्याय आहे. पनीर पाच मिनिटे गरम करुन आयोडीन टिंचर टाकावे. त्यानंतर त्याचा रंग निळा झाला तर ते भेसळयुक्त पनीर आहे.