पुण्यात संतापजनक घटना! चिमुकलीला आईनेच दाखवले ‘तसले’ व्हिडिओ, कपडे काढायला लावले अन् ..; हॉटेल मालकीणीसह बॉडीगार्डवर गुन्हा दाखल..
पुणे : पाच वर्षाच्या मुलीला मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून तसेच तिच्यासमोर अश्लिल प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासोबतच या मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिचा विनयभंगही केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी तिच्या आईसह बॉडीगार्डवर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मोदीबाग येथे पाच महिन्यांपूर्वी २५ मार्च २०२३ रोजी झाला आहे. याप्रकरणी काळेवाडी येथील एका ३४ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या नणंदेच्या दिराची ५ वर्षाची मुलगी आहे. पिडीत मुलीची आई व तिचा बॉडीगार्ड यांनी मिळून तिला मोबाईलमध्ये बॅड व्हिडिओज दाखविले.
त्यात दोघेही अंगावरील सर्व कपडे काढून एकमेकांना किस व हग करुन बेडवर पडणे असे प्रकार केले. पाच वर्षाच्या मुलीसमोर अश्लिल व्हिडिओ दाखवून तिचे अंगावरील सर्व कपडे काढून तिचा विनयभंग केला.
हे कोणाला सांगितले तर तुला त्या व्हिडिओमधील लोकांना विकून टाकेन. ते तुझ्याबरोबर व्हिडिओ सारखेच करतील,असे धमकी दिली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान हॉटेलच्या मालकीवरुन पती-पत्नीत वाद सुरु असून, हॉटेल मालकिणीने पती व त्याच्या नातेवाईकांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.