फळांचा राजा हापूस आंबा बाजारात डेरेदाखल, दर किती? वाचा महत्वाची माहिती..

पुणे : फळांचा राजा हापूस आंबा डेरेदाखल आला आहे. सिंधुदुर्गाच्या बाजारपेठेत हापूस आला असून ग्राहकांनी हापूस खरेदीसाठी एकच गलका केला आहे. हापूस बाजारात आला असला तरी त्याचा भाव मात्र खिशाला परवडणारा नाही.
सध्या तरी हापूसचा एक डझनचा भाव १५०० रूपये आहे. मात्र, खाणारांना काय त्याचे? हापूस बाजारात चढ्या दराने आला असला तरी सर्वसामान्य खवय्यांना एप्रिलमध्येच हापूसची खरी लज्जत घेता येणार आहे.
दरम्यान, दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे.यंदा हापूस वेळेवरच बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांची आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे.
हापूस, पायरी जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. या आंब्यांचा दरही १४०० ते १५०० रुपये प्रतिडझन दर सांगितला जात आहे. हाच दर मे महिन्यात ४०० ते५०० रुपये डझन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.