वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना मनाला दुःख देणारी! अजित पवार सरकारवर संतापले..
पुणे : काल पालखीला सोहळ्याला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. वारकरी आणि पोलीस समोरासमोर आले. यावेळी लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर राज्याचे वातावरण देखील चांगलेच तापले. अनेकांची या गोष्टीचा निषेध केला आहे.
अनेक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या मुद्द्यावरून संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं.
आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे अजित पवार म्हणाले.