नवऱ्याने फक्त चहा मागितला पत्नीने थेट डोळ्यात कात्रीच खुपसली, नवरा झाला रक्तबंबाळ, घटनेने उडाली खळबळ…

Crime : नवरा बायकोचे नाते खूप खास असतं. मात्र नात्यात कधीही भांडणे होत नसतील असे घडत नाही. कोणत्या नात्यात भांडण होत नाही? असे म्हणतात की जिथे चार भांडी असतील तिथे ते वाजतील. त्याचप्रमाणे पती-पत्नीमध्ये भांडणेही होतात.
पती-पत्नीमध्ये भांडण होत असते. मात्र, काही वेळा या भांडणाचा परिणाम फार धक्कादायक होतो, याची प्रचिती आता प्रदेशातील बागपत येथून समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला गरम चहा मागितला, पण यामुळे पत्नी इतकी चिडली की तिने चहा बाजूला ठेवला आणि थेट पतीच्या डोळ्यात कात्री खुपसली.
त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर दुखापतेनंतर पती वेदनेने किंचाळत होता. मात्र तरीदेखील पत्नीला काही दया आली नाही. पतीला तशाच वेदनेत सोडून तिने घरातून पळ काढला आणि ती फरार झाली.
यांनतर त्या इसमाच्या आरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य घरात आले आणि त्यानंतर त्यांनी इसमाला दवाखान्यात दाखल केले आणि याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडित इसमावर सध्या मेरठमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पत्नीने पतीच्या डोळ्यात कात्री खुपसली आणि त्यानंतर ती फरार झाली आहे. पकडले जाण्याच्या भीतीने ती घरातून पळाली आणि फरार झाली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, ते पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.