स्वतंत्र नगरपरिषदेबाबत फुरसुंगी उरुळीबाबत हरकतीवरील सुनावणी पूर्ण

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अधिसूचनेवर तब्बल साडेचार हजार हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या.
आता याबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत अहवाल लवकरच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे.
फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली, असे असताना कर जास्त आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करीत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी केली.
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
याबाबतची प्रारूप अधिसूचना चालू वर्षी 31 मार्च रोजी प्रसृत केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. यामुळे आता काय होणार हे लवकरच समोर येईल.