रिक्षाचालकाला सॉरी म्हणूनही माजी आमदाराला बेदम मारहाण! मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू, घटनेने खळबळ..

बेळगाव : रिक्षाचालकाने केलेल्या बेदम मारहाणीनंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना कोसळून माजी आमदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बेळगावमध्ये खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ घडली आहे.
लहू मामलेदार (वय.६९) असे त्यांचे नाव असून ते गोव्यातील फोंडा मतदारसंघातून २०१२ ते १७या कालावधीमध्ये आमदार होते.
मिळालेल्या माहितीनुसार लहू मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले असताना खडे बाजारमधील शिवानंद लॉजकडे जात होते. लॉजकडे जात असताना त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. या घटनेत रिक्षाला काही झालं नसल्याने मामलेदार यांनी सॉरी म्हणत कार घेऊन निघून गेले.
लॉजसमोर येताच कार पार्किग करत असताना रिक्षा चालकाने पाठलाग करत आला होता. त्याने लहू मामलेदार कारमधून उतरताच भांडणाला सुरुवात करत बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा प्रकार लक्षात येताच लॉज चालकांसह उपस्थित धावले.
थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही रिक्षाचालकाने मारहाण सुरुच ठेवली. यानंतर जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होणार आहे.