शेतकऱ्याने आंब्याला दिले चक्क शरद पवारांचे नाव! म्हणाला, शरद पवार मुख्यमंत्री असताना…
सोलापूर : सध्या सोलापूरमधील एका शेतकऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे सोलापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सावात एका शेतकऱ्याने चक्क एका आंब्याचा जातीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव दिले आहे.
या आंब्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. या शेतकऱ्याचे नाव दत्तात्रय गाडगे असे आहे. माढा तालुक्यातील अरण मधील रहिवाशी आहेत. गाडगे यांच्या अडिच किलोच्या आंबा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
गाडगे यांच्या या आंब्याला ग्राहकांकडूनही चांगली मागणी मिळत आहे. गाडगे यांनी आंब्याच्या कलमावर अनेक प्रयोग करून अडिच किलोचा आंबा पिकवला आहे. गाडगे यांच्या शेतात या कलमाची जवळपास २० ते २५ झाडे आहेत.
त्यांनी या आंब्याला ‘शरद मँगो’ असे नाव दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
याच योजनेतून आठ एकरमध्ये सात हजार आंब्याची झाडे लावल्याचे गाडगे यांनी सांगितले आहे. यामुळे अडीच किलोच्या आंब्याला गाडगे यांनी शरद मँगो असे नाव दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.