वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्या वकिलाचे काळे कारनामे उघड, आता सगळी कुंडलीच समोर आली…

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत पोलिसांनी तिच्या सासरच्या पाच नातलगांना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी एक वेगळा दावा केला आहे.
हुंड्यासाठी सासरच्यांकडून अनन्वित छळ झालेल्या वैष्णवीची त्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी तिचा पती, नणंद, सासू, सासरे व दीर यांना पोलिसांनी अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्याने कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
वैष्णीचा पती, सासू व नणंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने वाढवण्यात आली तर दीर व सासऱ्यांना ३१ में पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. मात्र कोर्टातील युक्तिवादादरम्यान हगवणे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने जी विधानं केली, त्याने सगळेच संतापले आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरणी हगवणे कुटुंबाची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट उचलत तिच्यावर नको नको ते आरोप केले. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी, दुशिंग यांनी केला असून त्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं , ते आम्ही आम्ही दाखवू शकतो, असं वकील दुशिंग म्हणाले होते.एवढंच नव्हे तर नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या या वकिलावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे.
दरम्यान मोठ्या व छोट्या सुनेला क्रर वागणूक देऊन छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येत असतानाच आता त्यांच्या वकिलाबाबतही अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे कुटुंबाची बाजू कोर्टात मांडणारे वकील विपुल दुशिंग यांचं व्यक्तीमत्वही असच वादग्रस्त असून त्याच्यावर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचं उघड झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या विपुल दुशिंग या वकिलावर याआधी २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि गुन्हा दाखल कण्यात आला होता. वडगाव मावळ कोर्टात प्रेम कुमार अग्रवाल या वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अशी माहिती समोर आली आहे. विपुल दुशिंग आणि त्यांच्या दोन सहकार्या विरोध वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.