Bus Accident : बस दरीत कोसळून भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू तर १५ जखमी
Bus Accident : बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधून एकूण २० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. याबाबत अधिकची माहिती अशी की, परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतदेह बसमध्येच अडकले असून ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.