सर्वात आनंदाची बातमी! आता पेट्रोल १५ रुपये लिटरने मिळणार, गडकरींनी सांगितला ‘हा’ फॉर्म्युला..
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडकरींनी असा फॉर्म्युला सांगितला आहे, ज्याद्वारे एक लिटर पेट्रोल केवळ १५ रुपयांना मिळू शकणार आहे. असे गडकरी म्हणाले आहे.
गडकरी म्हणाले की, जर ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली तर पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होऊ शकते. यामुळे प्रदूषण तर दूर होईलच, पण इंधनाची आयातही कमी करता येईल.
नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील प्रतापगड येथे ५६०० कोटी रुपयांच्या एकत्रित मूल्याच्या ११ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर हे विधान केले. ते म्हणाले की, सध्या इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे.
दरम्यान, तो कमी करता आला तर हा पैसा बाहेर पाठवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. अशा परिस्थितीत शेतकरी अन्नदाते तसेच ऊर्जा दाता बनू शकतात. इथेनॉल उसापासून तयार होते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ऊस आहे. असे देखील म्हणाले आहे.