पुणे महापालिकेच्या रिंगणात पुन्हा दिसणार ताई विरुद्ध दादा लढाई; कोण बाजी मारणार?


पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणांची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच पुणे महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आहे.याच अनुषंगाने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची पुण्यात एक बैठक पार पडली. या बैठकीच नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केल. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये आपले सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्याच टार्गेट दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे दोन पक्ष एकत्रित लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी परस्परांच्या विरोधात लढतील असे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.तसेच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पेक्षा आपले नगरसेवक जास्तच निवडून यायला हवे’, असं स्पष्ट आणि ठणकावून कार्यकर्त्यांना सांगितल आहे.

दरम्यान या आधीच्या विधानसभा निवडणुकीत माहीतला 288 मतदारसंघापैकी 235 जागावर दणदणीत विजय मिळवण्यात यश आलं. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कोण बाजी मारत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.पुणे महानगरपालिकेत पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजितदादांच्या पक्षापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा टार्गेट दिल. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील घेतला. तर यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!