नाशिकच्या डॉक्टरवर झालेल्या हल्लाने उडाला थरकाप! तब्बल १९ वार करीत निर्घून हत्येचा प्रयत्न..!

नाशिक : एका तरुणाने हॉस्पिटलच्या डॉक्टरवर एकामागून एक १९ वेळा कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. यामुळे घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डॉ.कैलास राठी असे जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. हे नाशिकच्या पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलचे संचालक आहेत. या हल्ल्यात डॉक्टर रक्तबंबाळ झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारीच्या रात्री डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडवर बसले होते. यादरम्यान एक अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आला होता. आरोपी तरुण अगदी डॉक्टरच्या जवळ उभा होता. डॉक्टर सोफ्यावर बसून कोणाशी तरी बोलत होते. त्यानंतर आरोपी तरुणाने डॉक्टरच्या डोक्यावर वार केले आणि यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान, सध्या डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण घटना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. डॉक्टरांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.