पुरंदर तालुक्यातच विमानतळ होणार! पण कधी? पुरंदर विमानतळाची दिशा ठरेना…


सासवड : पुण्यात 1996 पासून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र अजून यावर काही प्रक्रिया झाली नाही. या विमानतळाची दिशा अद्याप ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चाकण, खेडनंतर आता पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ होणार असल्याचा पुनरुच्चार वारंवार करण्यात येत आहे.

दहावीचा निकाल अखेर जाहीर! यंदा ९३.८३ टक्के निकाल, मुलींनी मारली बाजी..

शिंदे सरकारने पुण्याचे नवे विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याची घोषणा करून सहा महिने झाले. मात्र नंतर काही हालचाल झाली नाही. यामुळे सगळं काही शांत आहे.

तू परत रस्त्यावर दिसली तर बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर घातली गाडी; दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यामध्ये कोणताच नेता यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेण्यास तयार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य सरकारने भूसंपादनाची जबाबदारी ‘एमआयडीसी’कडे सोपविली आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

या विमानतळासाठी सुमारे चार ते पाच हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पुरंदर या ठिकाणी करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्णय दिल्ली दरबारी रखडला आहे. जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल दिल्लीदरबारी पाठविला आहे. मात्र दिल्लीत काही हालचाल होताना दिसत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!