उद्धव ठाकरे-केजरीवाल मुंबई महापालिका निवडणूक एकत्र येऊन लढवणार…?
निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील : अरविंद केजरीवाल
मुंबई : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (ता.२४) रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत ‘उद्धव ठाकरे शेर का बच्चा’ असे म्हणत केजरीवाल यांनी ठाकरे यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच कोरोना काळातील कामाचे देखील त्यांनी यावेळी कौतूक करत सध्या सर्वौच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई ठाकरे जिंकतील असेही ते म्हणाले.
याचदरम्यान त्यांना येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठाकरेंशी युती करणार का असे विचारले असता ? या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, यावेळी दोन्ही पक्ष मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार का, या प्रश्नावर केजरीवाल यांनी निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगितले. त्यामुळे ठाकरे-केजरीवाल एकसाथ येत आता मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार का, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावेळी देशात दंगली, व्देशाचे राजकारण काही लोक करत आहेत, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाना साधला. भाजपविरोधी पक्षानी एकत्र आले पाहिजे अशी चर्चा देखील या बैठकीत झाली. केजरीवाल यांच्यासोबत यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंग, खासदार राघव चढ्ढा हे देखील उपस्थित होते.