Thackeray Group : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ…

Thackeray Group : ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी समोर आली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शरद कोळी हे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
याच शरद कोळी यांना आता जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. पण त्यांना राजकीय कारणातून ही धमकी आलेली नाही तर वेगळ्या कारणास्तव धमकी आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. याविरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली. Thackeray Group
त्याचबरोबर सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याचीही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोळी यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे शरद कोळी यांच्या भाषणामुळे त्यांना जळगाव जिल्ह्यात भाषणास बंदी घालण्यात आली होती.
शरद कोळी यांना त्यावेळी पोलिसांकडून अटक केली जाणार होती. पण ते जळगावमधून अज्ञातस्थळी रवाना झाले होते. शरद कोळी यांनी सुरुवातीला शिंदे गटाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे ते प्रसिद्ध झाले होते