ठाकरे बंधूंची युती फिस्कटली! संजय राऊत थेट ‘शिवतीर्थ ‘वर दाखल, काय होणार चर्चा?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवळपास वीस वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकूर बंधूंच्या युतीत स्वीकृत नगरसेवक पदावरून पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. यावरून आता त्यांची युती फिस्कटली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे
यांच्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरून दिलेला उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी नाकारला आहे. यामध्ये त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने याचा फायदा महायुतीला देखील होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी आता संजय राऊत पुढे सरसावले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारल्यामुळे 5 मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. आता या संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे बंधूंच्या या युतीच्या तणावाचा महापालिकेत सत्तेत असलेल्या महायुतीला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंमधील संबंधांमधील कटुता वाढल्याचे यातून स्पष्ट होत आहे. आता मनसे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.