सोरतापवाडीत भीषण तिहेरी अपघात! सळई थेट पिकअपमध्ये घुसली अन्….


उरुळी कांचन : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत स्कुल बस व लोखंडी गज वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झाला आहे.

हा अपघात बुधवारी (ता. ०८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन बाजूकडे जाताना देवकर पेट्रोल पंप परिसरात झाला आहे. स्कुल बस ही ऑलिंपस स्कुल ऑफ एक्सलन्स या संस्थेची असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून उरुळी कांचन बाजूकडे निघाली होती. यावेळी पाठीमागे लोखंडी गज घेऊन लोणी काळभोर येथील गुरुदत्त सेल्स कार्पोरेशन नाव असलेला पिकअपने समोर निघालेल्या स्कुल बसला जोरदार धडक दिली.

       

दरम्यान, या धडकेत पिकअपमधील लोखंडी सळ्या या समोर असलेल्या स्कुल बसच्या पाठीमागील बाजुमध्ये घुसल्या, तसेच पिकअपला पाठीमागे असलेल्या एका हायवा ने धडक दिल्याची माहितीही काही नागरिकांनी दिली आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही. अपघात पाहण्यासाठी वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल क्साले असून वाहतुक सुरळीत करून अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!