सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीत आगीच्या स्फोटाचे भयंकर आवाज; भीषण आगीत कामगार अडकल्याची शक्यता..

सोलापूर : गेल्या काही दिवसापासून सोलापूरात आगीच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. अशातच आत्ता सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाई असोशिएट असे कंपनीचे नाव आहे.ही एक केमिकल कंपनी आहे. आग लागल्यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत होते.. त्यामुळे कंपनीच्या आत नेमकं काय घडतंय, याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. या कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही केमिकल कंपनी असल्यामुळे आग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या कंपनीला आग लागल्यानंतर इतर कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सोबतच लोकांना आग लागलेल्या कंपनीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाला सूचना देण्यात आलेली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. केमीकलच्या कंपनीला आग लागलेली असल्याने आग कधीपर्यंत आटोक्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
